लोक न्यूज-
जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनात देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,
ओबीसीच्या विविध मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. आमच्या मागण्या अशा
आहेत की,
१) जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात यावी. २) बिहार राज्याप्रमाणे ओबीसींची जात निहाय जनगणना महाराष्ट्रात करण्यात यावी.

३) ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध महामंडळाची कर्जमाफ शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरीत मागे घ्याव्यात.

४) महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आणि आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करावा. ५) निवडणूकांमध्ये ईव्हीएम चा वापर बंद करण्यात यावा. 
 महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह सुरू करण्याच्या निर्णयाच्या त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. वरील मागण्याचा केद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन उचित कार्यवाही व्हावी. या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागामार्फत दि. १५ मे २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.