नंदुरबार -लोक न्यूज
नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंबांना म्हाडा योजना अनुसार मोफत घरकुल बांधुन द्यावे यासाठी दिनांक 13 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे खोडाई माता टेकडी व इमाम बादशाह टेकडी या भागात घरकुल योजना राबवण्यात यावी, अशी मागणी बेघर संघर्ष समितीकडून होत असून गोरगरीब कुटुंबांना एक हजार घरकुलाच्या बांधकाम लवकर सुरू करावा व घरकुलाचे बांधकाम साठी त्वरित निधी उपल्ब्ध करून म्हाडा योजना नुसार गोर गरीब कुटुबांना मोफत घरकुल बांधुन देण्यात यावे या साठी दिनांक 13 मार्च 2023 रोजी नंदुरबार उप जिल्हाधिकारी सुधिर खांदे यांना निवेदन बेघर संघर्ष समितीचे नेते दिलावरशा कादरशा, रेहाना गाणी खाटीक, डॉ.रामचंद्र वसंत शिंपी, यांचे वतीने देण्यात आले आहे.या वेळी शेकडो कार्यकते उपस्थित होते

