लोक न्यूज-
दि. २४/०३/२०२३ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजेच्या सुमारास अमळनेर ते धुळे रोडवरील जानवे गावाच्या पुढे असलेल्या पांडुरंग पेट्रोलपंपावर दोन अज्ञात इसमांनी बंदुकीचा धाक दाखवुन पेट्रोलपंपावरील कॅशिअर यांचे कडुन सुमारे ३६,५००/- रु. बळजबरीने हिसकावून नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.न.८९/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. राज कुमार यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्ह्यांतील आरोपीतांचा तात्काळ शोध घेण्यासाठी आदेशित केले होते. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव यांनी देखील भेट देवुन गुन्ह्यांचा आढावा घेवुन त्याप्रमाणे गुन्ह्यांत उपयुक्त सुचना दिल्या.
सदर गुन्ह्यांत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदारांचे तीन वेगवेगळी पथके तयार केली व गुन्ह्यांतील हकीकत प्रमाणे गुन्ह्यांतील आरोपीतांचे बारकाईने निरीक्षण करुन तसेच गुन्ह्यांतील सी.सी. टि. व्ही. फुटेज मधील आरोपीतांचे बारकाईने निरीक्षण केले असता गुन्ह्यातील आरोपीतांनी परीधान केलेले कपडे, बुट व वाहन यांचे अवलोकन करून आरोपीतांचा शोध होणेकामी पथकांना सुचना केल्या. त्या दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन संशयित इसमांचा बारकाईने तपासणी करुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याबाबत निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यांकामी अटक करुन नमुद आरोपीतां कडुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान ७७,४००/- कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन, त्यात १ गावठी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतुस (गोळ्या) व गुन्ह्यांत वापरण्यात आलेली मोटर सायकल आणि पेट्रोलपंपावरील कॅशिअर यांचे कडुन बळजबरीने हिसकावुन नेलेल्या पैश्यांपैकी १७००/- रु. रोख रक्कम पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली आहे.
सदरच्या तपासात वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, पोउनि श्री. विकास शिरोडे, पोउनि श्री. अनिल भुसारे, पोहेकाँ. किशोर पाटील, पोना. दिपक माळी, पोना. डॉ. शरद पाटील, पोना. रविंद्र पाटील, पोना, योगेश महाजन, पोना. सिध्दांत सिसोदे अश्यांच्या पथकाने केली आहे.
