लोक न्यूज-
अमळनेर- गांधलीपुरा भागात : चालणाऱ्या वेश्या व्यवसायवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्याचे नियंत्रण पोलीस चौकीत होते.
राजू शेख गुलाब उर्फ भिकीचा राजा (वय ३२ ) व मोइझम शेख शब्बीर (वय १९) या दोघांनी हे कॅमेरे चोरून नुकसान केले होते. या व्यवसायाशी निगडित व ग्राहकांना लुटणाऱ्यांचा संबंध असावा असा संशय होता. पोलीस निरीक्षक विजय शिंदे हेडकॉन्स्टेबल कैलास पवार यांनी दोघांना अटक केली आहे.
