लोक न्यूज-
रमजान निमित्त शहरातील मुस्लिम भागात साफसफाई औषध फवारणी व बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी..... राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना गुरुवार (दि. 23) पासून सुरुवात होत आहे. या महिन्यात सकाळी सूर्योदयाअगोदर व सूर्यास्तानंतर मशिदीत नमाजपठण करण्यासाठी मुले व वयोवृद्ध व्यक्ती मशिदीत जात असतात. मात्र, शहरातील अनेक मुस्लिमबहुल भागातील पथदिवे बंद आहेत तसेच रस्त्याच्या कडेला घाण पडलेली असते. यामुळे रोजेदारांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे मुस्लिमबहुल भागातील सर्व पथदिवे सुरू करण्यात येऊन या महिन्यात दररोज साफसफाई व औषध फवारणी नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष नविद शेख, नईम पठान, तौसिफ शेख, साबिर बागवान, शाहरुख पठान आदींचे स्वाक्षरी आहे.
