अमळनेर-लोक न्यूज
अमळनेर येथील रामवाडी परिसर पाण्याच्या टाकीजवळ ओपन प्लेस च्या जागेवर भव्य दिव्य शिवालय मंदिराचे भूमिपूजन परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 51 फूट उंच व 21 खांब असलेले प्रशस्त सभा मंडप तसेच परिसरातील कंपाउंड व बाल उद्यान करण्याचे सूर्यमुखी सेवा समितीने ठरविले यावेळी प्रसाद महाराज यांचे स्वागत परिसरातील प्रा.एस बी सोनार यांच्या हस्ते महाराजांचे स्वागत झाले मंदिरासाठी पिंड व मुर्त्या अमळनेरातील कुसुमाई फर्निचर उद्योग समूह चे संचालक श्री दादा पवार यांनी देण्याचे कबूल केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूर्यमुखी सेवा समितीसह कार्यकर्ते व रामवाडी ,केशवनगर ,आयोध्या नगर ,बंगाली फाईल, समता कॉलनी, आयडीपी कॉलनी, तांबेपुरा, गायत्री कॉलनी या परिसरातील लोकांनी उपस्थित होते.

