लोक न्यूज-
सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट तर्फे पुण्यक्षेत्रम नीम , तालुका  अमळनेर 
 येथे दत्त जयंती उत्सहात साजरी झाला .
 सकाळी 10 वा उदी कुंभाची दिंडी पालखी मिरवणुक ,दिगंबरा दिगंबरा च्या गजरात निघाली .तापी वं पांझरा नदी च्या काठी निसर्गरम्य वातावरणात भक्ताचा जल्लोषात दिंडी निघाली, ह्या वेळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 
दू 12 वा पांझरा काठी, उत्सव मंडपात दत्तगुरु, श्रीपाद श्रवल्लभ , नृसिंह सरस्वती , स्वामी समर्थ व साईनाथ यांच्या तस्वरी सोबत उदी कुंभाची स्थापना झाली .
झेंडू च्या फुलांची सुंदर सजावट हे  खास आकर्षण होते . ह्या कार्यक्रमाचे  सूक्ष्म व पर्यावरण पूरक नियोजन होते.
   नंतर दत्तसहस्त्र नामंचे पठण होऊन भक्तिमय वातावरणात आरती झाली. 
   गुरुगिते चे पठण होऊन दर्शन झाले , 
    सायंकाळी उत्सावा ची सांगता झाली . कार्यक्रमा साठी महाराष्ट्रतून 5000 भाविक आले होते.