लोक न्यूज-
एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावर येऊन उगाच डिजिटल मीडिया बद्दल जनते मध्ये गैर समज होईल असे वाक्य वापरून डिजिटल मीडियाचे संपादक, प्रतिनिधी,डिजिटल मीडियाचे पत्रकार यांचे मनोबल कमी करण्याचे वाक्य वापरण्यात आले होते यांच्या मुळे प्रिंट मीडियाचा दर्जा खालावला गेला असे मत व्यक्त केले गेले असून 
डिजिटल मीडियाला खालचा दर्जा देण्याचे काम करू नये. डिजिटल मीडियावरील वृत्ताच्या विश्वासार्हतेबाबत  केंद्र सरकारने नोडल अधिकारी वेब पोर्टेल व युट्युब चॅनल साठी नेमले गेले आहेत . त्या अधिकाऱ्यांमार्फत या डिजिटल मीडियावर लक्ष ठेवले जाते. तसेच वेब पोर्टलव यु ट्यूब चॅनलचे संपादक व पत्रकार बांधव सुद्धा अतिशय निरपेक्षपणे वास्तववादी बातम्या देत असतात असाच आजवरचा जनतेचा व वाचकांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच दिवसेंदिवस वेब मीडियाच्या वाचकांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकशाही वाचविणे, जनतेचे प्रश्न मांडणे, जनतेच्या समस्यांना, प्रश्नांना वाचा फोडणे हा आम्ही घेतलेला वसा जनतेच्या व वाचकांच्या आशीर्वादाने डिजिटल मीडिया पार पाडत आला आहे , आणि भविष्यातही पार पाडत राहील. प्रिंट मीडियाला डिजिटल मीडिया नेहमीच सहकार्य करीत असतो. दोन्हींचे नाते अतिशय घट्ट असून उगाच कोणीही प्रिंट मीडिया श्रेष्ठ आणि डिजिटल मीडिया कनिष्ठ असा बुद्धिभेद करून वितुष्ठ निर्माण करण्यात आला होता.


डिजिटल वेब मीडिया बद्दल आपला अभ्यास कच्चा असेल तर अभ्यास करून घेणे भविष्यात आशा चूका होणार नाही?