लोक न्यूज-
अमळनेर, प्रतिनिधी- येथील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेत 6 डिसेंबर रोजी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
                  यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता कापडणेकर,ज्येष्ठ शिक्षक श्री सुर्यवंशी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण केले.
           याप्रसंगी जयवंत पाटील, योगेश शिरूडे ,के के पाटील, अजय भामरे ,शिवाजी मोरे, स्वप्निल पाटील, योगेश पाटील, उमेश पाटील, निलेश पाटील , मुकेश भोई,प्रदीप पाटील,मेघा पाटील, चंद्रकांत पाटील आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.