लोक न्यूज
अमळनेर : येथील मोठे बाबा मंदिराच्या प्रांगणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन विचारावरील कार्यक्रमात प्रा उल्हास पाटील बोलत होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते झाले.
परिचय संदीप घोरपडे यांनी करून दिला.
प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचे प्रवर्तक प्रा अशोक पवार यांनी केले.
७५ वक्ते तयार करण्याचा संकल्प त्यांनी सोडला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार मांडतांना प्रा उल्हास पाटील म्हणालेत कि,
सर्व माणसे सारखे आहेत 400 वर्ष्यापूर्वी सांगितले.
राज्यघटनेत संतांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे.
आमच्यात वंश जाती भेद नाही.हीच भूमिका ते मांडत होते.
13 व्या शतकात संतांनी महिलांना समतेचा अधिकार दिला.
भक्तीच्या नावाखाली भेदाभेद शिकविला जातो.
तुकाराम लहान, तरुण आणि वृद्धांना समजून सांगायची गरज.
तुकाराम महाराजांच्या घरातील आठ पिढया वारकरी संप्रदायात होते.
पिढीजात सावकारी होती.
दुष्काळ पडल्याने...
आई वडील गेले.
दुष्काळ पडलेला असतांना ते सभोवतालची स्थिती बघून अस्वस्थ झाले.
लेखणी कसायांनी चुकीचे तुकाराम मांडले.
शेतकऱयांच्या कर्जमुक्ती साठी गहाण खत फाडून टाकलीत.
सुलतानी गुलामीतून बाहेर करीत सैनिकी शिक्षणासाठी तुकारामांनी अभंग लिहिलेत.
मावळ प्रांतातून सर्वाधिक मावळे तुकाराम महाराजांनी शिवाजी राज्यांना दिलेत.
हजारो पिढ्या अज्ञातवासात गेल्याने त्यांची विचारशक्ती संपवली.
व्रत वैकल्या च्या माध्यमातून समाजाला भ्रमित केलं,वैचारिक गुलाम केलं.
संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी भागवत धर्म दिला.
विठ्ठला शिवाय आमचं दुसरे दैवत नाही.
भक्त वेल्हाळ विठ्ठल आमचा देव भक्तांची आठवण करतो.
विठाई साठी कुठलंही कर्मकांड करण्याची गरज नाही.त्याचं नाव घ्या फक्त, काहीही थोतांड करण्याची गरज नाही.
स्वर्ग आणि नरक हे थोतांड आहे अशी भूमिका त्याकाळी संतांनी घेतली.
लाभ होईल असा व्यापार करायला सांगणारे तुकाराम खरे व्यापारी सुद्धा होते.
नामदेवांनी विठ्ठल प्रस्थापित केला.
संत तुकाराम आपलं नात संत नामदेवांशी जोडतात.
रंजल्या गांजल्याच्या सेवेत देव आहे त्यांच्यात देव पहा.
नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती...
असं तुकाराम महाराज 17 व्या शतकात सांगतात.
बुद्धी वापरा
बुद्धीच्या वापराने प्रगल्भ व्हाल.अशी भूमिका मांडत,
प्रश्न विचारायला तुकाराम महाराज सांगतात.
समाज विवेकी पाहिजे यासाठी तुकाराम महाराज झटलेत.
बुद्धीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी युद्ध जिकलेत.
औरंजेब यांच्या तावडीतून शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली ती चातुर्याच्या जोरावर.
तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात केले असते तर देशातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या.
प्रसंगी विचारपीठावर माजी अप्पर जिल्हाधिकारी एच टी माळी, शिवाजीराव पाटील इत्यादी होते.
वाल्मिक पाटील गुरुजी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदे सर होते.
