वैजापूर - लोक न्यूज
मराठवाड्याचे साहित्यिक व स्वच्छतादूत संत गाडगेबाबा व शिर्डीचे साईबाबा यांची हुबेहूब भूमिका साकारणारे वैजापुरचे धोंडीरामसिंह राजपूत याना रविवार(ता,०४)रोजी अहमदनगर येथील दोस्ती फाउंडेशन चा"राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार"नागपूर विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ,एस, एन, पठाण,चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर व सिने अभिनेत्री वसुंधरा शर्मा, शब्धगंध अहमदनगरचे सुनील
गोसावी,यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, सदरील पुरस्कार लोककलावंत स्व,मजनू भाई शेख यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोस्ती फाउंडेशन अहमदनगर ने आयोजित केला होता,या प्रसंगी आयोजक फाउंडेशन अध्यक्ष रज्जाकभाई शेख, आनंदा साळवे,लोहगाव चे बाल साहित्यक अय्युब पठाण, किरणसिंह राजपूत,व राज्यातील साहित्यिक व लोक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

