अमळनेर-लोक न्यूज
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणार्‍या शिबिराला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी येत आहेत. परंतु त्यांनी महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याने त्यांच्या उपस्थितीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण पाटील, माजी अध्यक्ष अॅड. कुणाल पाटील यांनी विरोध करून खबरदार, शिवरायांचा अवमान करणारे राज्यपाल महोदय विद्यापीठात पाउल ठेवाल तर..! असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिनांक १८ ते १९ डिसेंबर दरम्यान 'आव्हान' शिबिर होत आहे, या शिबिरासाठी राज्यपाल महोदय कोश्यारी  येत आहेत. परंतु त्यांनी आमचे आणि महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याने आमच्या राजाच्या अवमानाच्या रोषाच्या स्वागताचेही 'आवाहन' त्यांना स्वीकारावे लागेल.  कारण, धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. ते विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत आहेत. छत्रपती शिवरायांचे मावळे ज्या विद्यापीठात शिक्षण घेताय त्या विद्यापीठात आमचे दैवत छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा व्यक्तीला आम्ही येऊ देणार नाही, आम्ही राज्यपाल या पदाचा आदर करतो पण त्या पदावर बसून बैताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा नाही. खरेतर  राज्यपाल महोदय आमच्या जिल्ह्यात आल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस  स्वागत करेल. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. कारण आमची "अतिथी देव भव" ही संस्कृती आहे. म्हणून त्यांचे स्वागत करणारच आहोत. परंतु आम्ही त्यांचे कश्या पद्धतीने स्वागत करणार हे ते आमच्या जिल्ह्यात आल्यावर त्यांना कळणार. आम्हाला राज्यपाल पदाचा नेहमीच आदर राहिला आहे. पंरतु सध्याच्या राज्यपाल महोदयांनी शिवरायांचा केलेला अवमान आम्ही कदापीही सहन करू शकत नाही. म्हणून खबरदार, कोश्यारी साहेब विद्यापीठात याल तर याद राखाल, आपण आमच्या निवेदनाच्या इशाराचा गांभीर्याने विचार करूनच यावे, आले नाही तर आपला फायदाच आहे, आले तर आमच्या पद्धतीने होणाऱ्या स्वागताचीही आपण तयारी ठेवावी, म्हणून सर्व प्रथम विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांना विनंती आहे की, राज्यपाल महोदयांना आमच्या भावना कळवाव्यात आणि कार्यक्रमाला गालबोट लागल्यास त्यास विद्यापीठ आणि विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.
असे भूषण भदाणे, अॅड. कुणाल पाटील  यांनी इशारा दिला आहे. तर निवेदनाच्या प्रती स्वीय सहाय्यक, राज्यपाल, मुंबई, जिल्हाधिकारी,  जळगाव, पोलिस अधीक्षक, जळगाव पोलिस महानिरीक्षक, नाशिक  यांना पाठवण्यात आले आहे.