लोक न्यूज-
अमळनेर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप चे १२ आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजप ने आघाडी सरकार , ठाकरे सरकारचा निषेध करून प्रतिकात्मक पुतळा जाळला.
दि.५ रोजी सायंकाळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली महाराणाप्रताप चौकात आघाडी सरकारचा धिक्कार असो , ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,प्रफुल्ल पवार,दूध संघ संचालिका भैरवी वाघ,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,विजय राजपूत,उपाध्यक्ष महेंद्र महाजन,दीपक पाटील,देवा लांडगे,युवा मोर्चा पंकज भोई,शिवाजी राजपूत,महिला मोर्चे कविता पाटील,शिक्षक आघाडी चंद्रकांत कंखरे,मुन्ना कोळी,राहुल चौधरी, समाधान पाटील,शेखर कुलकर्णी,दिलीप ठाकूर,गौरव माळी, सुमित हिंदुजा,बाळा पवार,आकाश माळी,कुंदन पाटील, पारस धाप,राहुल कंजर,असिफ पिंजारी,निखिल पाटील उपस्थित होते.