अमळनेर (रिपोर्ट)

सुरक्षित शाळा, सुरक्षित मुले या उपाययोजनांतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील कोळपिंप्री जि.प.प्राथमिक शाळा, एकरुखी प्राथमिक शाळा, पळासदळे प्राथमिक शाळा व रडावण प्राथमिक शाळांच्या  संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोळपिंप्री येथे जि.प.सदस्य रोहिदास दाजी, जि.प.सदस्य हिम्मत पाटील, पारोळा माजी पंचायत समिती उपसभापती अशोक नगराज पाटील, पारोळा माजी पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, दापोरी माजी सरपंच एल. टी.पाटील, कोळपिंप्री सरपंच छायाबाई सुरेश पाटील, उपसरपंच राजसबाई छबिलाल भिल, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच अनिल काटे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काटे, सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, चंद्रकांत काटे, सुनिल काटे, रमेश पाटील, सुरेश काटे, छबिलाल भिल, सुदाम काटे, सुनिल पाटील, प्रफुल्ल काटे, सुभाष नाना, नानभाऊ पाटील, पंडित आप्पा, गिरीश काटे, बालकनाथ महाराज, बाळू तात्या, संजय पाटील, पुंडा आबा, अमृत नाना, सदाशिव आप्पा, प्रविण पाटील, संदीप काटे, सुनिल कोळी, कैलास मोरे, शांताराम मोरे, दत्तू काका, जितेंद्र काटे, डॉ.नगराज काटे, पिंटू काटे, जिजाबराव काटे, पृथ्वीराज नाना, महेश नाना, खुशाल तात्या यांच्या सह ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

तर पळासदळे प्राथमिक शाळेत विकास पाटील, संजय शिंदे यांच्या सह ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

एकरुखी येथील कार्यक्रमात विपीन पाटील, प्रियाल पाटील, राहुल पाटील, किशोर पाटील, रविंद्र पाटील, अनिल पाटील, सुभाष पाटील, योगेश पाटील, हिरामण पाटील, जितेंद्र पाटील यांच्या सह ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व ग्रामस्थ मंडळ सदर कार्यक्रमसाठी उपस्थित होते.

रढावण येथे सरपंच वेडु चिंधु पाटील, माजी सरपंच वसंत आनंदा पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य भैय्यासाहेब पाटील,  वि.का.सो संचालक पंकज पाटील, गणेश पाटील, नामदेव पाटील, ग्रामसेवक, मुख्याध्यापक सह शिक्षक यांच्या सह ग्रामस्थ मंडळ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

जिल्हापरिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याने शाळा सुरक्षित झाल्या  असून मुलेही सुरक्षित राहणार आहेत, त्यामुळे शैक्षणिक साहित्य चोरी, शालेय पोषण आहार चोरी आदी बाबींवर नियंत्रण मिळवता येणार आहे, संरक्षक भिंत असल्याने मैदानातील मुलांवर देखील शिक्षकांचे लक्ष केंद्रित होणार आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त करून आमदार अनिल पाटील यांचे स्वागत केले आहे.