लोक न्यूज
अमळनेर – नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र (जितू) ठाकूर यांच्या प्रचाराला शहरभरातून प्रचंड, सकारात्मक आणि स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामान्य कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले, पत्रकारितेतून अन्यायाविरोधात नेहमी आवाज उठवणारे व सर्वसामान्यांचे आवाज बनलेले जितू ठाकूर यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.
शहरातील विविध भागात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, कामगार आणि सर्वसामान्य मतदार यांचा ठोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. “अमळनेर बदलूया, आपल्यातीलच माणसाला संधी देऊया!” हा नारा नागरिकांच्या तोंडी जोरात ऐकू येत आहे.
सर्वांसाठी सहज उपलब्ध राहणारे, मदतीसाठी तत्पर आणि स्पष्ट विकासदृष्टी असलेले नेतृत्व हवे असल्याचे बहुसंख्य नागरिकांचे मत असून, या पार्श्वभूमीवर जितू ठाकूर यांची दावेदारी अधिक बळकट होताना दिसत आहे.