लोक न्यूज
अमळनेर : शून्यातून उभ्या राहिलेल्या आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या जिद्दी व कष्टांच्या बळावर आज स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच जितेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्ष पदासाठी मतदारांची प्रथम पसंती मिळत आहे.
शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले जितेंद्र ठाकूर यांनी बालपणापासून अमळनेर शहरातील चढ-उतार पाहत वाढताना लहानपणीच घरातील गरिबीचे चटके सोसले. वडिलांचा छोटासा व्यवसाय असूनही शिक्षणाची ओढ कायम ठेवत ते पुढे जात राहिले. लहान वयात घरची जबाबदारी खांद्यावर घेताना अनेकदा पायरी चढण्याचा प्रयत्न अपुरा पडत असला, तरी हार न मानण्याचा त्यांचा जिद्दी स्वभाव कायम राहिला. बालपणापासून मोठं होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ठाकूर यांनी जनजीवनातील वास्तव अनुभवले. अनेक अडथळे, अपमान आणि संकटांवर मात करत त्यांनी B.A., M.A., M.Lib., LLB या पदव्या मिळवत शिक्षणाच्या मार्गावर भक्कम पाऊल रोवले.
पत्रकारितेतून अनेकांना दिला न्याय...
पत्रकारितेची आवड असलेल्या जितेंद्र ठाकूर यांनी समाजातील अन्याय, अडचणी आणि सामान्य नागरिकांच्या व्यथा लेखणीतून मांडण्याचा निर्धार केला. नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्भीडपणे काम केले. त्यातूनच ते अमळनेरकरांचे लाडके जितू भाऊ बनले.
व्यापक बदलासाठी उचलले पाऊल...
“खरा अर्थाने नागरिकांना न्याय द्यायचा असेल तर व्यवस्था बदलणे आवश्यक आहे,” त्यामुळे या राजकीय रणांगणात पाऊल टाकत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले असून “आपण दिलेला विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.