नांदेड (रिपोर्ट)
कोरोनाची भयावह साथ रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून नांदेड ता.धरणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संपूर्ण गावात ट्रॅक्टरकरवी फवारणी व्दारा गाव सॅनिटाईज करण्यात आले.
नांदेड गावाजवळील मुंगसे ता.अमळनेर येथिल लोकांचे बँकेच्या कामानिमित्त नांदेडला येणेजाणे सुरू असते. मुंगसे येथिल कोरोना बाधित महिला आर्थिक व्यवहार करण्यासाठी नांदेड येथे बँकेत आलेली होती. त्यामुळे नांदेडवासियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी खबरदारीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली आहे.
फवारणी प्रसंगी ग्रापं प्रशासक भगवान माळे, ग्रा.वि.अधिकारी मुरलीधर उशीर, तलाठी अल्ताफ पठाण, मंडळ अधिकारी गणेश बिऱ्हाडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप पाटील, डाॅ.विनय चौधरी, पोलीस पाटील शशिकला सैंदाणे हे उपस्थित होते. ग्रापं कर्मचारी अतुल बऱ्हाटे, चंद्रकांत बऱ्हाटे, डिगंबर भोई यांनी सहकार्य केले. गावातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
