लोक न्यूज
अमळनेर :  चार एक्स्प्रेस रेल्वे  गाड्यांना अमळनेर स्टेशनवर थांबा देण्यात यावा अशी मागणी  खासदार  स्मिता  वाघ यांना अमळनेर रेल्वे यात्री मंच तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.
    धार्मिक व उद्योगाच्या दृष्टीने अमळनेर हे महत्वाचे स्टेशन असून दररोज याठिकाणाहून अनेक प्रवाश्यांचे येणे जाणे होत असते. त्यामुळे
प्रेरणा एक्सप्रेस (२२१३७/२२१३८), पुरी - अहमदाबाद एक्सप्रेस (१२८४३/१२८४४) (वाया बऱ्हाणपूर) ,तांबरम - जोधपूर साप्ताहिक एक्सप्रेस (२२६६३/२२६६४), चेन्नई सेंट्रल - भगत की कोठी एक्सप्रेस (२०६२५/२०६२६) या चार रेल्वे गाड्यांना प्रवाश्यांच्या सोयीसाठी अमळनेर स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी अमळनेर यात्री मंचाचे डॉ. इम्रान अली शाह,भाजपचे शहराध्यक्ष योगेश महाजन,अयाज बागवान, अनिस खाटीक, उपस्थित होते.