लोक न्यूज-
अमळनेर-मागील आठवडाभर अमळनेर तालुका तसेच जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा बंद झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून काही गुरेही दगावली आहेत.या आपत्तीची तात्काळ दखल घेत महसूल, कृषी व विद्युत मंडळाला लवकरात लवकर पंचनामे सादर करण्याचे आदेश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहेत. 
      या अस्मानी संकटात राज्यसरकार व मदत व पुनर्वसन विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल अशी ग्वाही देखील मंत्री पाटील यांनी दिली आहे.