लोक न्यूज-
शिरपूर महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष उदय दळवी साहेब यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा. शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाला अजून गती मिळाली. शिरपूर येथील शनी मंदिरा जवळील अगणित मातांना उबदार चादरी वाटप करण्यात आले त्याचबरोबर फराळ देखील वाटप करण्यात आले. याप्रसंगी मातांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे शिवसेनेच्या उद्देश प्राप्तीसाठी यशस्वी ठरेल यात शंका नाही. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष देवा भाऊ बंजारा, तालुका अध्यक्ष संजय भाऊ जाधव, शहराध्यक्ष गणेश बिरारी, उप शहर अध्यक्ष जावीद शेख,उप शहर अध्यक्ष विजय पवार उप शहर अध्यक्ष महेश चौधरी उप शहर अध्यक्ष सोयब मन्यार त्याच्या पूर्ण टीमने मेहनत घेतली. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराना,उप तालुका प्रमुख मंगल भोई युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी मयूर पाटील, जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे, तालुका अधिकारी युवा सेना चेतन मोरे, उप तालुका अधिकारी जितेंद्र राठोड, विभाग अधिकारी युवा सेना चेतन जाधव तथा युवासैनिक उपस्थित होते.