लोक न्यूज-
राज्यातील दुष्काळाचे शासनाने खरीप २०२३ मध्ये मुल्याकंन MAHA-MAHADAT या प्रणाली मार्फत केलेले आहे. त्यानुसार राज्यातील ४० तालुक्यांचा ट्रिगर -२ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसा

शासन निर्णय महसुल विभागाने दि. ३१ ऑक्टो. रोजी प्रकाशित केला असुन या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमधून

अमळनेर व पारोळा हे तालुके वगळण्यात आले आहेत.

अमळनेर विधानसभा मतदार संघातील सर्व महसुल मंडळात सलग ४१ दिवस पाऊसाचा खंड होता व त्यामुळे अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी होते. यामुळे या दोन्ही तालुक्यात भूजलाची पातळी कमी झाली आहे व रब्बी हंगामातील पेरणीखालील क्षेत्र सुद्धा घटले आहे. अमळनेर व पारोळा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये पिक पैसेवारी ५० पैश्यापेक्षा कमी आहे. या दोन्ही तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे व पुढील काळात तीव्र पाणीटंचाईची सुद्धा शक्यता आहे.

अमळनेर व पारोळा या तालुक्यात दुष्काळ जाहीर न झाल्याने अमळनेर व पारोळा तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा, पुन्हा वस्तुस्थितीचा आढावा घेऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत समावेश करण्यात यावा.अशी मागणी मा.आमदार मा.आमदार शिरिषदादा चौधरी यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.