लोक न्यूज-
मैत्रेय प्रकरणाला येत्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्यासाठी शिरपूर तालुक्यातील आमदार श्री काशिनाथ पावरा यांना निवेदन देण्यात आले.
शिरपूर चे आमदार श्री.काशीनाथ पावरा यांना आज रविवार दि. 5.11.2023 रोजी शिरपूर येथे मैत्रेय प्रकरणासाठी मैत्रेय असोसिएशन कडून निवेदन देण्यात आले. आमदारांनी येत्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्या बाबत आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सोबत चर्चा करून मैत्रेय प्रकरणाला गती मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करीन असे आमदार काशीराम पावरा यांनी मैत्रेय असोसिएनला आश्वासन दिले .
निवेदन देण्यासाठी नानासाहेब पाटील, पिंटू दर्डा,संजय जाधव, राजेंद्र देवरे, छोटू राजपूत, ज्ञानेश्वर पाटील, रामेश्वर गोसावी,परमेश्वर पाटील,पुनम शिंदे,सुषमा मराठे,आशा पाटील, व शिरपूर तालुक्यातील असंख्य प्रतीनिधी व ठेवीदार उपस्थित होते.
