लोक न्यूज-
अमळनेर :- आज रोजी न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर येथे मोठ्या उत्साहात नवरात्रीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व त्यांचे पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. मा. प्राचार्या प्रेरणा मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गरबा नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या गरबा महोत्सवात पालकांनी उत्साहाने भाग घेतला. लहान थोर सर्वांनीच या गरबा महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. प्रथम राउंड नर्सरी ते चौथी, दुसरा राउंड पाचवी ते सातवी व तिसरा राउंड आठवी ते दहावी वर्गाचा घेण्यात आला. या नंतर सर्व पालक व शिक्षकांनी फेर धरत कार्यक्रमाची रंगत वाढविली. जसजसे फेर वाढत गेले तसतशी कार्यक्रमाला रंग चढत गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. दीपाली राजपूत व श्री. के. पी. बागुल सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.