लोक न्यूज-
आज रोजी दिनांक 26-10-2023
राकेश दिनकर साळुखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, धुळे व विजय गोरख पाटील, वरिष्ठ सहायक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे यांनी तक्रारदार यांचे कडुन एकूण ९१,००० लाचेची मागणी करून त्यापैकी ३५,०००/- पहिला टप्पा स्विकारतानां रंगेहाथ पकडल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा, रामपुरा ता. शिरपुर, जि. धुळे येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्याची पेसा मधुन नॉनपेसा मध्ये बदली होणेकरीता, मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगबाद कडून आदेश पारित झाले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., धुळे यांचेकडे बदली होणेकरीता विनंती अर्ज सादर केला होता. त्यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहानभूतीपूर्वक विचार करावा असा शेरा मारून सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीस्तव श्री राकेश सांळुखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कडे पाठविला होता.
त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी शिक्षणाधिकारी राकेश सांळुके यांची भेट घेवून त्याच्या बदली अर्जावर कार्यवाही करण्याकरीता पाठपुरावा करीत होते. त्यादरम्यान शिक्षणाधिकारी सांळुखे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे पाठविण्यासाठी २५,०००/-रु लाचेची मागणी केली होती. तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय पाटील यांनी तक्रारदार यांच्या बदली अर्जावरून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. महाले, कार्यालयीन अधिक्षक (सा.प्र.), पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता ६६,०००/- रु लाचेची मागणी केल्याची ता.प्र. विभाग, धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगने पडताळणी केली असता, शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे (प्राथमिक) यांनी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रु लाचेची मागणी करून तडजोडीअंती २०,०००/- रु मागणी करुन वरिष्ठ सहायक विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. तसेच वरिष्ठ सहायक, विजय पाटील त्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री. महाले, कार्यालयीन अधिक्षक (सा.प्र.), व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता ६६,०००/- पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५१,०००/- रु लाच स्विकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता ३५,०००/- रु स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द धुळे शहर पोस्टे जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
