लोक न्यूज-
'वर्ल्ड एन्व्हायरमेंट कौन्सिल' या दिल्ली स्थित संस्थेतर्फे २०२३ सालचे "नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड" जाहीर झाले असून त्यामध्ये जे शिक्षक गेली ३० वर्षे पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात उत्तम अध्यापन करत आहेत अशा सहा शिक्षकांना हा पुरस्कार पर्यावरण दिनी देण्यात येणार आहे. हे सहा पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे - श्रीमती विद्या तानाजीराव जाधव (महाराष्ट्र), प्रा. हेमलता तलेस्रा (गुजरात), डॉ. संतोष सोनवणे (उत्तर प्रदेश), डॉ. बी. एल. यादव (दिल्ली), प्रा. हेमंत सुधाकर सामंत (महाराष्ट्र), डॉ. चरमसिंग ठाकूर (जम्मू अँड काश्मीर). हे पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश चन्ना यांनी सांगितले. प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनी महाराष्ट्रात अनेक शाळेत पर्यावरण विषयक कार्यशाळा घेतल्या आहेत.