लोक न्यूज-
अमळनेर नगर परिषदेची झामी चौक येथिल पाण्याच्या टाकी चे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने परिसरात तीव्र पाणी टंचाई भासू लागल्याने भोईवाडा येथिल नागरिकांच्या तक्रारी व मागणीनुसार वडचौक भागातील माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते आकाश माळी यांच्या हस्ते मोफत पाण्याचा ट्रैकर पाठवून दिला* अन भोईवाडा भागातील स्थानिक नागरिकांची पाणी टंचाई साठी सहकार्य केले.