वैजापूर-लोक न्यूज
राज्यातील इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या इयत्ता ५वी च्या सुलभ मराठी पुस्तकात मराठवाड्याचे जेष्ठ बालकवी धोंडीरामसिंह राजपूत यांची कविता"बैल -पोळा"महाराष्ट्र शासनाने वर्ष२०१५पासून अभ्यासक्र-
मात समाविष्ट केलेली आहे,राज्यातील विद्यार्थी गेल्या नऊ  वर्षांपासून त्यांची" बैल-पोळा"कविता अभ्यासत आहेत, मंगळवार(ता,२६)रोजी पुण्यातील सुप्रसिद्ध विद्यालय डॉ.कलमाडी इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या प्राचार्य व उप प्राचार्य व शिक्षकानी राजपूत यांना खास निमंत्रित केले,राजपूत यांनी पाठाच्या पंचपदी पायऱ्या व पोळ्याच्या बैलांचे सजवलेले चित्रासह, गाऊन,व प्रत्येक कडवे सोप्या भाषेत स्पष्ट करून ,प्रश्नोत्तरे विचारून ही कविता शिकविली, विद्यार्थ्यांनी राजपूत यांना अनेक प्रश्न विचारले,कविता कशी सुचली?कविता केंव्हा पासून करतात?बैल पोळा कविता कशी सुचली?वगैरे प्रश्न ही विचारले, प्रत्यक्ष कवी वर्गात येऊन कवी शिकविताना पाहून विद्यार्थी खूप-खूप आनंदले,  या प्रसंगी  या विद्यालयांच्या उप प्राचार्या श्रीमती कुलकर्णी, इंदोर येथील कृषी विद्यापीठचे सेवा निवृत्त अधिष्ठाता डॉ,अमरसिंह राजपूत,      
 व्यवस्थापन समितीच्या मालती कलमाडी,
नेत्रा ताम्हाणे ,अनविषा बलदेव राजपूत,व पाचव्या इयतेतील २०० विद्यार्थी ,या विद्यालयचा शिक्षक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.