वैजापूर- लोक न्यूज
मराराठवाड्याचे जेष्ठ बालसाहित्यिक व राज्यातील विविध वर्तमानपत्र चे जेष्ठ स्तंभलेखक,साहित्यक धोंडीरामसिंह राजपूत यांनी लिहिलेल्या "मित्रप्रेम"या बालकथा संग्रहाचे प्रकाशन रविवार(ता,१३) रोजी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र, स्वातंत्र्य सैनिक कॉलोनी,संभाजी नगर येथे  पोलीस अधिक्षिका मोक्षदा पाटील, लोहमार्ग औरंगाबाद व त्यांचे चिरंजीव मास्टर आरमान अस्तिकुमार पांडे यांच्या हस्ते बालार्पण करण्यात आले,या प्रसंगी अध्यक्षस्थानी लेखिका लीला शिंदे,तर प्रमुख अतिथी म्हणून समाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा होत्या,व्यासपीठावर रश्मी कुमठेकर यांची उपस्थिती होती,निमित्त होते विद्या वितरण प्रकाशन संस्थेने छापलेल्या ५१ बाल पुस्तकांचे सामूहिक प्रकाशन व प्रकाशन क्षेत्रातील प्रवेशाचे,रजत प्रकाशन चे अशोक कुमठेकर यांनी प्रास्ताविक केले,तर प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन केले,मोक्षदा पाटील यांनी मोबाईल संस्कृती वाढत असल्या बद्धल चिंता व्यक्त केली, ५१बाल पुस्तके बालकांनी वाचावीत व संस्कार संस्कृती टिकवावी असे मत त्यांनी व्यक्त केले,लीला शिंदे व मंगल खिंवसरा यांनी बालकात वाचन संस्कृती ह्या ५१पुस्तकाच्या वाचनातून निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.