वैजापूर -लोक न्यूज
मराठवाडा विभागातील जेष्ठ बाल साहित्यिक,वृत्तपत्र स्तंभ लेखक ,व वैचारिक लेख लिहिणारे व संपूर्ण राज्याला परिचित असलेले येथील जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह, ध ,राजपूत यांची महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरीक महासंघ(फेस्कॉम) च्या मराठवाडा प्रादेशिक
विभाग(उत्तर)च्या जनसंपर्क सचिवपदी बुधवार(ता,०९)रोजी नियुक्ती करण्यात आली, मराठवाडा प्रादेशिक विभाग(उत्तर)चे अध्यक्ष अशोक तेरकर व सचिव जयवंत सोमवाड यांनी त्यांचीनियुक्ती
केली असून ,या नियुक्ती पत्रात नमूद केलेले आहे की,राजपूत यांच्या अनुभव संपन्न कार्याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना मिळावा व त्यांचे जेष्ठ नागरिक समस्या सोडवण्यासाठी असलेले प्रयत्न व सातत्य याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना व्हावा या साठी त्यांची संपर्क सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे,त्यांनी आपले कार्य
लगेच आरंभ करून जेष्ठ नागरिक जबाबदारी पार पाडावी असे नमूद केले,राजपूत यांनी राज्यातील जेष्ठ नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्या बद्धल संघाचे
आभार मानले आहे,
