लोक न्यूज-
स्वातंत्र्य दिवस चिरायू होओ....
 न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल अंमळनेर येथे 76 वा स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक  हेमंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात  आले. या प्रसंगी श्रीमान वाघ सर तसेच मा प्राचार्य मधुकर शिंदे संस्थाध्यक्ष शितल देशमुख  सौ अश्विनी लांडगे  यांची उपरचिती होती
             या कार्यक्रमाची सुरुवात  प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाचे स्वागत करीत स्कूल चे विद्यार्थी प्रतिनिधी मा. अमेय लांडगे व कु. नेहा पाटील यांनी गार्ड ऑफ ओनर देत कार्यक्रम स्थळी आणले. या नंतर ध्वजारोहण श्री हेमंत पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे सत्कारार्थी प्रमुख पाहुणे शिंदे सर आणि वाघ सर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी स्कूल च्या विद्यार्थी युनिट ने परेड करीत राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.या नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तोमोत्तम देशभक्ती पर गीतांवर आपले नृत्य सादर केलीत. या कार्यक्रमाचा पालकांनी ही मनमुराद आनंद लुटाला. या सोबतच शाळेच्या काही लहान मोठया मुलांनी या दिवसाचे महत्व विषद करीत माहित असलेल्या व अज्ञात  शहीदांना शब्द सुमनांनी मानवंदना दिली व त्यांच्या त्यागाचे स्मरण करीत देशासाठी जगण्याची शपथ घेतली.
    श्री मधु शिंदे  यांनी भारतीय इतिहासाच्या परकीय आक्रमनापासून तर देश स्वातंत्र्य होई पर्यंतचा इतिहास अगदी साध्या व सोप्या शैलीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. या नंतर वाघ सर यांनी शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख अधोरेखित करीत भविष्यात हीच शाळा नावलौकिक करील असा आशावाद व्यक्त करीत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.या वेळी समापनीय भाषण करतांना विद्यालयाच्या प्राचार्या मा. प्रेरणा पाटील मैडम यांनी शहीदानां स्मरण करीत 'आम्ही सारे भारतीय' या भावनेने या देशाची एकता व अखंडता कायम राहील यासाठी आपण सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले व सर्व विद्यार्थ्यांना तशी शपथ ही दिली.यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी मा. अमेय लांडगे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित सर्व पालकांचे आभार मानले.
          हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.