वैजापूर-लोक न्यूज
वैजापूला सरला बेटचे महंत सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांची "लेनेको हरिनाम-करनको अन्नदान"ही परंपरा लाभलेली आहे,याचाच भाग म्हणून शनिवार(ता,२९)रोजी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप च्या वतीने संकट मोचन मंदिर समोर बसणाऱ्या दीन, दुबळ्या,गोर,गरीब व दिव्यांग यांना  अधिक -श्रावण महिन्याचे औचित्य साधत खिचडीचे अन्नदान करण्यात आले, या भुकेल्या चेहऱ्यावर अन्नाचे द्रोण मिळाल्या बरोबर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता,या ग्रूप च्या प्रमुख  वर्षा शिंदे दीदी व समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी व ग्रुप सदस्यांनी
सकाळी साडे सात वाजता हे  अन्नदान केले,त्यांना सुनील गायकवाड,अमर भाटिया,सूरज राजपूत, अलका साखरे, साक्षी टेके,सुमन पोंदे,निर्मला दाभाडे,साबरे,इत्यादींनी सहकार्य केले.