वैजापूर-लोक न्यूज
विद्यार्थ्यांना ई, व्ही,एम ,द्वारे मतदान प्रक्रिया कशी असते ते प्रत्यक्ष कृतीतून कळावे,म्हणून पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका
सुवर्णा बोर्डे यांनी मोबाईल (कंट्रोल युनिट)व टॅब चा उपयोग (बॉलट युनीट)म्हणून करून येथील विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळ ची निवडणूक मतदानाने घेतली,प्रत्यक्ष मतदान अधिकारी नेमून व ईव्हीएम च्या कार्यप्रणाली द्वारे ही प्रक्रिया पार पडून पुढील प्रमाणे मंत्रिमंडळ निवडून आले,मुख्यमंत्री-कु,कावेरी त्रिभुवन,उपमुख्यमं-मंत्री--आदित्य जाधव,सांस्कृतिक व शिक्षण मंत्री--ओम त्रिभुवन,अर्थमंत्री- अर्जुन विश्वकर्मा,परिपाठमंत्री--कु,अरीबा पठाण,स्वच्छता मंत्री-अनास शेख, क्रीडा मंत्री-सुरेश साबळे,शिस्त मंत्री-मंतशा सय्यद, बुधवार(२६,जुलै) या कारगिल विजयी दिनी या सर्वांचे अभिनंदन मुख्याध्यापिका नीता पाटील,व माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,निवडणूक ई ,व्ही, एम ,प्रक्रियेत मार्गदर्शन धोंडीराम राजपूत यांनी केले,शिक्षिका राजश्री बंड, लता सुखासे,ज्योती दिवेकर, वैशाली पगारे, बी,बी,जाधव,श्री रावकर,श्री, संदीप शेळके यानी सहकार्य केले.
