चोपडा-आज दि.५/८/२०२० रोजी चोपडा येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत ३२ विधवा महिला भगिनींना प्रत्येकी  २०,००० रुपयांच्या धनादेश माजी आ.प्रा.चंद्रकांतजी आण्णा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी जिल्हा प्रमुख महिला आघाडी रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, तहसिलदार अनिल गावित, महिलाआघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, जि.प.सदस्य श्री.हरिष पाटील,मा.उपसभापती एम.व्ही.पाटील,पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर,तालुका संघटक सुकलाल कोळी,अॅड. शिवराज पाटील,प्रविण बाबा देशमुख,प्रताप पावरा,नायब तहसिलदार राजेश पौळ  उपस्थित होते.