भुसावळ (रिपोर्ट )- 
    जामनेर गुन्ह्यातील फरार आरोपीला येथील  बाजारपेठ पोलिसांनी टिंबर मार्केट भागात जेरबंद केल्याची घटना गुरुवार ६ ऑगष्ट रोजी येथे घडली .  
    जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बळीराम जयराम माळी राहणार गिरीजा कॉलनी जामनेर यांच्या घरून चोरी व जबरी चोरी करून ११लाख ४४ हजार ५६२ रुपये चोरून पोबारा झालेला होता.त्याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला दिनांक ८ मे २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या गुन्ह्यातील आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
    जामनेर येथील बळीराम जयराम माळी वय ७५ राहणार गिरीजा कॉलनी जामनेर यांच्या घरून चोरी व जबरी चोरी करून ११,४४,५६२ रुपये घेऊन दिनांक ८ मे २०२० रोजी पोबारा झाल्याने जामनेर पोलीस स्टेशनला गुरुन १४२/२०२० भाग -५ कलम ३८०,३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र उर्फे (जितू) किसन गोडले वय २७ राहणार वाल्मिक नगर भुसावळ हा गेल्या ४ महिन्यापासून  फरार झाला होता.दिनांक ६ ऑगेस्ट २०२० रोजी जामनेर पोलीस स्टेशनचे सपोनि धरणसिंग सुंदरडे यांनी शोध घेण्यास कळविले होते.
     सदर गुन्ह्यातील आरोपी भुसावळ शहरात टिंबर मार्केट परिसरात फिरत असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशाने दिनांक ६ ऑगष्ट गुरुवार रोजी पोना रविंद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर,महेश चौधरी,पोकॉ कृष्णा देशमुख, विकास सातदिवे,प्रशांत परदेशी अशांनी आरोपीस टिंबर मार्केट परिसरातुन ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केले . 
  दरम्यान  निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशाने जामनेर पोलीस स्टेशनचे सपोनि धरणसिंग वि.सुंदरडे व पोकॉ अमोल घुगे यांना पुढील कारवाई साठी यांच्या ताब्यात दिले.
 आरोपी जितेंद्र उर्फे (जितू) किसन गोडले हा रेकॉड वरील गुन्हेगार असून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशन,सावदा पोलीस स्टेशन,जामनेर पोलीस स्टेशन, येथे  गुन्हे दाखल आहेत.