लोक न्यूज-

दि.7/2/23 रोजी. ना. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पाडळसे धरणाविषयी माहिती देताना बाळासाहेब शिवसेना पक्षाचे नेते पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवार पाडळसरे धरण संघर्ष समिती च्या आंदोलनाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ दखल घेऊन संघर्ष समितीकडून माहिती मागवली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाची नविन सुधारीत प्रशासकीय मान्यता तातडीने मंजूर होणे व पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश होणेबाबत जळगांव जिल्हयातील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण १९९९ पासून सुरुवात होऊन निधीअभावी व राजकीय इच्छाशक्ती नसलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळे रखडलेले आहे. सुरुवातीस १४२ कोटी रु. किंमत असलेले हे धरण रखडल्याने मागील ३३ वर्षात याची किंमत अ. द. मा.से. ३१०० कोटी इतकी झाली आहे. अमळनेर तालुक्यासह पारोळा, चोपडा, धरणगांव, धुळे, शिंदखेडे या ६ तालुक्यातील व २ जिल्हयातील लाखो शेतकरी यांचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. सदर पाडळसे धरणास सर्व शेतकरी स्तरावरील मान्यता सु.प्र. मा. महाराष्ट्र शासनाने तातडीने द्याव्यात तसेच केंद्र शासनाच्या पी.एम. के. एस. वाय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा या मागणीचे ५१ हजार पत्र आपल्या जन्मदिवसाला ९ फेब्रुवारी २०२३ रोजी अमळनेर येथून पोस्टात भव्य मिरवणूकीने टाकले जाणार आहेत. आपण सदर मागणीचा गांभिर्याने विचार करून येथील जनतेस न्याय द्यावा. पाडळसे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आपल्या पक्षाचे चोपडा, पारोळा, धरणगांव या ३ मतदार संघात आपले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेले आहेत. म्हणून सदर प्रश्नासाठी लढणाऱ्या पाडळसे धरण जन आंदोलन समितीसोबत प्रशासकीय बैठक लावण्यात यावी आणि आपल्या जन्मदिवसाची भेट म्हणून समितीच्या मागण्या मंजूर व्हाव्यात. 

.