लोक न्यूज
वासरे ता. अमळनेर येथे बाह्य स्रोत  वीज कर्मचारी ( आऊट सोरसिंग फोर्स  वायरमन) सत्यपाल चौधरी हे गावाबाहेर असलेल्या रोहित्रावर (डी. पी.)वर काम करीत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांना तिथेच लटकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांनी पाहिल्यावर त्यांना लागलीच अमळनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
     सविस्तर वृत्त असे की, सत्यपाल चौधरी हे  वासरे गावात काम करण्यासाठी आले असता त्यांनी गावलगत असलेल्या रोहित्रावर ए बी स्वीच बंद करीत डी. वो उतरवून  वीज पुरवठा बंद केला त्यांनी गावातील किरकोळ काम करीत पुन्हा रोहित्र वर जात पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले असता त्यांना त्याठिकाणी विजेचा शॉक लागल्याने ते रोहित्रवर लटकलेले दिसताच दीपक पाटील यांनी कळमसरे येथे सब स्टेशनवर संपर्क साधीत वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर त्यांना खाली उतरविल्यावर  अमळनेर येथे उपचारासाठी हलविले.
जखमी सत्यपाल चौधरी यांच्यावर डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे उपचार सुरु असून त्यांना अति दक्षता विभागात दाखल केले असल्याचे कळमसरे येथिल ज्युनिअर ईंजिनियर यांनी दिली.
   यावेळी वासरे येथील
जिजाबराव खंडू पाटील, नानाभाऊ वना भिल, विनोद अशोक पाटील,संजय धनराज पाटील, दीपक रमेश पाटील,सुरेश शांताराम पाटील,एकनाथ संतोष  पाटील संजय गुलाबराव पा  अंकुश शांताराम पाटील,दीपक भिमराव पाटील, दीपक पांडुरंग पाटील यांनी लागलीच सत्यपाल चौधरी यांना पुढील उपचारार्थ  दाखल केले. मात्र अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. अनिल शिदे यांनी सांगितले.



========================
विजेच्या धक्क्यामुळे होणारी गंभीर जखमी कशी असते?
विजेचा शॉक लागल्यावर शरीरातून विजेचा प्रवाह जातो, त्यामुळे:
• जळालेली त्वचा (Burns) – विजेचा प्रवाह त्वचेतून आत जातो आणि जिथून बाहेर पडतो त्या ठिकाणी त्वचा भाजते. कधी कधी आतील अवयवही जळतात.
• हृदयाचे ठोके बंद होणे (Cardiac Arrest) – वीजेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात किंवा थांबू शकतात.
• स्नायूंमध्ये आकुंचन (Muscle Spasms) – अचानक, तीव्र वेदना व स्नायूंमध्ये जोरदार आकुंचन होते.
• मेंदूवर परिणाम (Neurological Damage) – स्मृतीभ्रंश, झटके, बेशुद्ध होणे किंवा पक्षाघात होऊ शकतो.
• हाडे तुटणे किंवा पडणे – विजेच्या धक्क्यामुळे माणूस जोरात फेकला जाऊ शकतो, त्यामुळे इतर जखमा होतात.
• अंतर्गत जळणं (Internal Burns) – दिसायला लक्षणं कमी असली तरी शरीरात खोल आतपर्यंत जळणं झालेलं असतं.

कोणत्या प्रकारची वीज अधिक धोकादायक असते?
• उच्च दाबाची वीज (High voltage – 1000V पेक्षा जास्त) खूप गंभीर जखमा करते.
• कमी दाबाची वीज (Low voltage) देखील हृदय, स्नायू आणि मेंदूवर परिणाम करू शकते.

तातडीने काय करावं?
• वीज पुरवठा बंद करा (स्वतःचा जीव धोक्यात न घालता).
• जखमी व्यक्तीला विजेपासून दूर करा (कोरड्या लाकडी काठीने किंवा इन्सुलेटेड वस्तूने).
• श्वासोच्छवास व हृदयाचे ठोके तपासा.
• CPR ची गरज असल्यास तातडीने सुरू करा.
• त्वरीत रुग्णालयात नेणं अत्यंत गरजेचं आहे.