मा.पंकज मुंदडा
लोक न्यूज
अमळनेर येथील दि.अमळनेर अर्बन को.ऑप.अर्बन बँकेचे शतकमहोत्सवी वर्षात अर्बन बँकेने ऑनलाईन बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून त्याची मंजुरी ही मिळवली असल्याचे जाहिर करीत शतक महोत्सवी वर्षात कार्यरत राहिलेले चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी आपल्या पदाचा एक वर्ष कार्यकाळ पूर्ण करून नुकताच स्वेच्छेने राजीनामा दिला असून संचालक मंडळाने खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सभेत सदर राजीनामा मंजूर केला. बँकेचे जेष्ठ संचालक प्रविण जैन हे सभेच्या अध्यक्ष स्थानी होते.
अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा यांनी यावेळी बोलतांना , बँकेच्या शतक महोत्सवी वर्षात अमळनेर अर्बन बँकेने ऑनलाईन बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून त्याची मंजुरी ही आपण मिळवली असल्याचे सांगत वर्षभर केलेल्या भरीव कामगिरीसाठी संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. व्हाईस चेअरमन रणजीत शिंदे यांनी शतक महोत्सव वर्षात बँकेच्या झालेल्या भरभराटीसाठी संचालक मंडळाने एकदिलाने केलेल्या कामामुळे यश मिळाले. हे यश सर्वांचे सामुहिक यश आहे असे सांगत नवीन संचालक म्हणून विश्वासाने दिलेल्या संधीबद्दल उपस्थित संचालकांचे आभार मानले. सभेचे अध्यक्ष प्रविण जैन यांनी , लवकरच पुढील चेअरमन , व्हॉईस चेअरमन निवड करण्याची कार्यवाही नियमानुसार केली जाईल असे यावेळी सांगितले. संचालक पंडित चौधरी यांनी आभार मानले.याप्रसंगी संचालक लक्ष्मण महाजन , भरतकुमार ललवाणी, प्रदिप अग्रवाल, दिपक साळी,अभिषेक पाटील, प्रविण पाटील , जेष्ठ संचालक मोहन सातपुते,सौ. वसुंधरा लांडगे, डॉ.मनीषा लाठी ,अँड.विजय बोरसे आदि उपस्थित होते. सभेचे कामकाज बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी पाहिले.