लोक न्यूज

गणेश उत्सव व आगामी ईद-ए-मिलाद अशा हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणाच्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित रहावी कायदा व सुव्यवस्था कायम राहावा याकरिता अमळनेर पोलीस उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा आज दिनांक २८/०८/२०२५ रोजी ०९.४५ ते ११.४५ वाजेच्या दरम्यान पोलीस मुख्यालया जळगाव कडील कवायत निर्देशक यांचे मार्गदर्शनात तसेच मा.श्री.विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अमळनेर भाग, अमळनेर व श्री. दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत अमळनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधिलीपुरा येथे मॉकड्रिल (दंगा काबू योजना) ढाल, लाठी, गॅसगन,  शिल्ड, ग्रेनेड सह सराव घेण्यात आलेला आहे. सरावा दरम्यान सर्व अधिकारी व अंमलदार यांना दंगा काबू योजनेस संदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
      

तदनंतर अमळनेर शहरातील संवेदनशील असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, बाजारपेठ, तिरंगा चौक, कुंटे रोड, पवन चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डीपी, जामा मशीद, सराफ बाजार, दगडी दरवाजा, गुळ बाजार, गांधलीपुरा चौकी अशा भागात  अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, मारवड पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार, पारोळा पोलीस स्टेशन कडील अंमलदार, एरंडोल पोलीस स्टेशन कडील अंमलदार, पोलीस मुख्यालया कडील दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्स व अशां अधिकारी व अंमलदार यांचा रूट मार्च घेण्यात आलेला आहे.

     सदर रूट मार्च कामी अमळनेर पोलीस स्टेशन कडील ०४ अधिकारी ३६  अंमलदार, मारवड पोलीस स्टेशन कडील ०१ अधिकारी ११ अंमलदार, पारोळा पोलीस स्टेशन कडील १० अंमलदार व एरंडोल पोलीस स्टेशन कडील ०७ अंमलदार, ०१ दंगा नियंत्रण पथक, ०१ स्ट्रायकिंग फोर्स, ६२ होमगार्ड हजर होते
     अमळनेर उपविभागातील पोलिसांच्या या सरावात सामान्य जनतेचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे..