लोक न्यूज
संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेली आणि सांस्कृतिक ,धार्मिक आणि औद्योगिक वैभव लाभलेली पवित्र भूमी म्हणजे अमळनेर शहर असून सांस्कृतिक व वैचारिक वारसा लाभलेल्या या भूमीला नुकताच महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव म्हणून विशेष दर्जा बहाल केला आहे.सर्व जाती धर्माच्या बांधवांना सामावून घेणारी ही उदारमतवादी भूमी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने विकासात्मक झाली असल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे.
          यासंदर्भात शहरातील व्यापारी लालचंद सैनानी,भरतकुमार ललवाणी,निलेश भांडारकर, भाईदास महाजन,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, अजय केले, प्रितपाल सिंग बग्गा, बापू हिंदुजा, जितेंद्र भामरे, भाजप शहराध्यक्ष विजय राजपुत, कमल कोचर, दिनेश कोठारी, जूनैद शेख, विजयकुमार जैन, दत्ता कासार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ते म्हणाले की महाराष्ट्रातील उज्वल पान म्हणून अमळनेरची ओळख निर्माण झाली असली तरी गेल्या काही वर्षांपासून येथे उणीव भासत होती ती विकास कामांच्या वैभवाची.मात्र 2019 साली झालेली विधानसभेची निवडणूक या भूमीसाठी विकासाची नांदीच निर्माण करणारी ठरली कारण भूमिपुत्राच्या रूपाने प्रचंड कार्यकुशल आणि अभ्यासू असं नेतृत्व अनिल दादाच्या रूपानं पुढे आल.अनिल दादाने या भूमीत विकासनिधीचा जणूकाही पाऊसच पाड ला,कोट्यवधीच्या निधिने आणि त्यातून होणाऱ्या विकासाने येथील जनताही सुखावली .उत्तर महाराष्ट्रात कोणत्या शहराचा चेहरा मोहरा गेल्या पाच वर्षात बदलला असा प्रश्न कुणी कुठेही केला तर सहजच प्रत्येकाच्या मुखावर एकच नाव येते ते म्हणजे अमळनेर शहर आणि याचे खरे श्रेय जाते ते भूमिपुत्र अनिल पाटील यांना.
         शहरात  भूमिपुत्र अनिल दादाच्या कर्तुत्वाने भव्य असे महसुलचे प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू असून त्याशेजारी च सर्व शासकीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतीचे कामही होत आहे,पंचायत समितीच्या इमारतीचे नुकतेच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामही सुरू झाले असून यासोबत एस टी डेपो चेही भूमिपूजन होऊन तेही काम सुरू होणार आहे.युवकांच्या दृष्टीने आणि त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचा मोठ कार्य अनिल दादाने केले आहे ते म्हणजे मांरवड रस्त्यावरील निधी अभावी अडगळीत पडलेल्या क्रीडा संकुलास त्यांनी निधी आणून चालना दिली,त्यामुळे हे क्रीडा संकुल खेळाडूंनी फुलू लागले आहे.आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नांनी हॉलचे नूतनीकरण,जॉगिंग ट्रॅक,कंपाऊंड,रंगरंगोटी,दुरस्ती,बास्केट बॉल सह इतर मैदान,आदी कामे झाली असून आता पुन्हा 6.66कोटी निधी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने यातून कुस्ती,ज्युडो, तायक्वांदो, जिमनेकस्टिक चा स्वतंत्र हॉल,क्रीडा साहित्य व विविध सुविधा निर्माण होऊन हे क्रीडा संकुल नीच्छितच क्रीडा क्षेत्रासाठी पर्वणी ठरणार आहे.लवकरच जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धा येथे होऊन स्थानिक खेळाडूंना भविष्यात संधी प्राप्त होणार आहे.
       याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास सारेच रस्ते नवीन झाले असून विशेष करून मुख्य बाजारपेठेत एकाही  रस्त्यांचे काम आज शिल्लक नाही .वस्त्या आणि कॉलनी परिसरातील अनेक रस्ते देखील नवीन होऊन काही रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत.शहराच्या चारही बाजूला डी. पी. रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे.शहराच्या मुख्य रस्त्यावर एकाच रंगाचे जंबो पथदिवे लगल्याने  शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे.यासोबतच मंग्रलग्रह मंदिरासाठी 25 कोटी निधी मिळविल्याने लवकरच मंदिर परिसराचा प्रचंड कायापालट होऊन अनपेक्षित बदल होणार आहे.शहरासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून 197 कोटींची दररोज पाणी देणारी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून लवकरच शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था अनिल दादाने केली आहे.शहराच्या उद्योगाला चालना देणारी ही योजना आहे.शहरातील एकमेव मोठे उद्यान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानास 80 कोटी निधी देऊन नूतनीकरणासह सुशोभीकरण होऊन हिरवेगार नंदनवन येथे साकारल्याने हे उद्यान छोटे पर्यटन केंद्र आणि मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्यांना पर्वणी ठरले आहे.याशिवाय इतर लहान उद्यान सुशोभीकरण असेल,नंदनवन साकारलेल्या अंबरीश महाराज टेकडीवर नवीन रस्ता  असेल किंवा दगडी दरवाजाचे सुशोभीकरण असेल ही सारी कामे दादांनी पूर्ण केलेली आहेत.नवीन दगडी दरवाजाच्या निर्मितीमुळे या मुख्य रस्त्यावरील कोंडलेला श्वास नक्कीच मोकळा झाला असून येथील वाहतूकही सुरळीत झाली आहे.नुकतेच टॅक्सी स्टँड साठी पिकअप शेड निर्माण केल्याने प्रवासी व चालकांना उन वारा व पाऊस पासून सरक्षन कवच मिळाले आहे.याव्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी योगा हॉल,गटार बांधकाम,खुला भूखंड सुशोभित करणे,अभ्यासिका आदी कामे करून नागरिकांची सोय करण्यात आली आहे.
          अनिल पाटील यांनी या भुमीसाठी सर्वात मोठे कार्य केले असेल तर ते म्हणजे गुन्हेगारीचा लगलेला कलंक गेल्या पाच वर्षात नष्ट करून या भूमीला आणि येथील  नागरिकांना सुरक्षित केले आहे.यामुळे विशेष करून महिला भगिनी आणि व्यापारी बांधव भूमिपुत्र चा अभिमान बाळगू लागले आहेत. यामुळे असा उमदा आणि व्हिजन असलेला नेताच पुन्हा आमदार म्हणून हवा,,असा सूर शहरवासीयांच्या मुखात येऊ लागला असून गेल्या पाच वर्षात कोणताही भेदभाव न करता प्रत्येक समाजालाच जीव लावल्याने प्रत्येक समाज कुटुंबाप्रमाणे जुळला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     आणि यामुळेच शहरात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचेही ते म्हणाले.