लोक न्यूज-
अमळनेर- दिनांक १९फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे महाराजांच्या पुतळ्याला अध्यक्ष ऍड. भारती अग्रवाल यांच्या हस्ते माल्यार्पण शिवाजी गार्डन येथे करण्यात आले. याप्रसंगी सचिव सौ.कपिला मुठे, उपाध्यक्ष सौ. स्मिता चंद्रात्रे, खजिनदार सौ वनश्री अमृतकार जिल्हा निरीक्षक मकसूद बोहरी, बँकिंग सायबर प्रमुख विजय  शुक्ल, ताहा बुकवाला व अजिज बोहरी आदी उपस्थित होते अशी माहिती सौ. मेहराज बोहरी यांनी कळवली आहे.