लोक न्यूज-
आजच्या या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नगाव  गावातील सुपुत्र सन्माननीय आर्मी  ऑफिसर (फौजी) श्री. कमलेश आत्माराम पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच गावातील बन्सीलाल दगा पाटील यांच्या घराजवळील गावातील सुपुत्र सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी)श्री. रविंद्र रघुनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि  गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांच्या उपस्थितीत  गावातील सुपुत्र सन्माननीय आर्मी ऑफिसर (फौजी) श्री. प्रमोद मधुकर बोढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या शुभ मंगल प्रसंगी  गावातील तिघे देश सेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांना या ध्वजारोहणाचा मान सन्मान  गावातील सरपंच  तसेच इतर सदस्य गावातील जेष्ठ श्रेष्ठनागरिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद  यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा मान या तिघांना देण्यात आला. असेच आपल्या गावातील सुपुत्र उत्तरोत्तर प्रगती करतील आणि पुढे जातील अशी  शुभ दिनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. जय हिंद जय महाराष्ट् भारत माता की जय अश्या घोषणा दिल्या..
 उपस्थित मान्यवर महेश पाटील, विनोद जाधव, ग्रामसेवक देसले आप्पा, तलाठी पिंगळे आप्पा, सर्कल पाटील ,  सर्व शिक्षक आणि गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.