लोक न्यूज-

येथील प्रतापनगर मधील रहिवासी व झाडीचे सरपंच डॉ.भुपेंद्र पाटील यांना घरासमोर असलेल्या जागेत तीन चार चिमण्या चोचिने हल्ला चढवत होत्या त्यावेळी पोपट जखमी होऊन जीव वाचवायचा प्रयत्न करत होता अशा अवस्थेत जखमी पोपटाचा जीव वाचवून त्यांनी पोपटाला घेऊन प्रतिनिधीला फोन केला असता प्रतिनिधींनी तात्काळ प्रतिसाद देत त्यांना सदर पोपटाला घेऊन  धुळे रोड वरील पशुवैद्यकीय दवाखान्यात  आणण्यास सांगितले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.कोरे यांनी दवाखान्यात इंजेक्शन दिले ड्रॉप लिहून दिला जखमी पोपटवर उपचार झाल्या नंतर दुरुस्त झाल्या वर तो पोपट निसर्गात सोडून देण्याचे सांगितले. सदर पोपटाला घरी घेऊन जाऊन झाडी चे सरपंच डॉ.भुपेंद्र पाटील व अमोल वाणी यांनी त्या पोपटला घेऊन दोन दिवस त्या पोपटाला ड्रॉप देऊन स्वस्थ झाल्यावर पोपट निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार आहे असे डॉ.भुपेंद्र पाटील यांनी सांगितले.