अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील स्मार्टग्राम योजनेतील विजयी गावांची घोषणा नुकतीच जि प निवड समितीकडून झाली असून यात 2018-2019 या वर्षात तालुक्यातील एकतास गावाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामस्थ कमालीचे सुखावले आहेत.
एकतास गाव 2018-19 साठी अमळनेर तालुक्यात प्रथम विजेता ठरला असताना हे गाव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीही पात्र ठरले होते,मात्र उत्कृष्ठ काम व नाविन्यपूर्ण योजनांमुळे हे गाव जळगाव जिल्ह्यात देखील प्रथम आल्याने कौतुकास्पद ठरले आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही स्मार्टग्राम स्पर्धा राबविली जात असून यास आता स्व आर आर आबा पाटील सुंदर गाव योजना असे नाव देण्यात आले आहे,2017-18 मध्ये अमळनेर तालुक्यात आदर्शगाव सुंदरपट्टी चा प्रथम क्रमांक आला होता,त्यानंतर 2018-19 मध्ये एकतास गाव तालुक्यात प्रथम तर या वर्षी दहिवद गाव तालुक्यात प्रथम विजेते ठरले आहे,परंतु यात एकतास गावाने जिल्हास्तरीयमध्ये देखील प्रथम क्रमांक मिळविला आहे.
एकतास गाव 2018,19 मध्ये तालुक्यात प्रथम आल्याने 10 लाखांचे बक्षीस जाहीर असून जिल्हास्तरीय प्रथम 40 लाखांचे बक्षीस एकतास व खंडाळा तालुका भुसावळ याना विभागून जाहीर झाले आहे,सदर दोन्ही बक्षीस जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, ग्रा प निवडणूकीमुळें बक्षीस वितरणास विलंब झाला आहे.
एकतास गावाचे वैशिट्य म्हणजे याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, महिला स्वच्छतागृह,घरोघरी शौचालय युनिट ,घरोघरी 100 टक्के नळ कनेक्शन, अंगणवाडी व ग्रा प ला संरक्षण भिंत व इतर आवश्यक सुविधा,संपूर्ण गावात भुयारी गटारी, परिपूर्ण स्वच्छता, संपुर्ण गावाचे एलईडीकरणं असून गावासाठी पांझरा नदीतून दोन पाणी पुरवठा योजना आहेत.विशेष म्हणजे गावाची लोकसंख्या अवघी 1081 असताना नियोजनबद्ध कारभारामुळे हे गाव जिल्ह्यात आदर्श ठरले आहे.
गावाचे आधारस्तंभ साहेबराव चिंधा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच सौ मंगलबाई साहेबराव पाटील,ग्रामसेवक जगदीश पवार आणि ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून हा विकास झाला आहे.दरम्यान गावात सुमारे 125 ते 150 लोकांना विविध निवृत्त योजनांचा लाभ मिळवून दिला असून यातही हवं गावं तालुक्यात आघाडीवर आहे,या गावाला लोकप्रतिनिधी, प स चे पदाधिकारी व गटविकास अधिकारी आणि अधिकारी तसेच इतर राजकीय पदाधिकारी यांचे सतत मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे साहेबराव पाटील यांनी सांगितले.
जिल्हा स्थराव एकतास गावाचे नाव प्रथम क्रमांकावर आल्याबदल सरपंच व सर्व ग्रामस्थान चे आभिनंदन
जय श्री राम