लॉक डाऊन मध्ये रोजगार बुडाल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांना दोन वेळेचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. पोटापाण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या मजुरांची अवस्था तर अधिकच केविलवाणी आहे.
पोराबाळांना सह उपाशीपोटी पायीच घरी परतणाऱ्या मजूरांच्या पोटात दोन घास जावेत, यासाठी नगावबारी चौफुली येथील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय दमाबाई दगा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून सतत पंधरा दिवस अन्नदान व थंड पाणी, बिस्किट वाटप करत आहोत.तसेच आमचा ट्रक व्यवसाय असल्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये पायी जाणारे वयोवृद्ध लोकांना आम्ही आमच्या गाड्यांमध्ये बसवून दिले जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री हिरालाल पाटील,भूषण वाघ,राहुल पाटील,संभाजी पाटील,अमनदीप पाटील,पियुष,बाबा,सचिन,आणि कुलदीप पाटील,यांनी पुढाकार घेतला आहे.