.            अनिल पाटील






प्रतिनिधी अमळनेर

अमळनेर विधानसभा निवडणूक दोन वेळा लढलो प्रामाणिक राहून पराभव पत्करावा लागला आता ही लढाई लढत असतांना देखील अडथळे येत आहेत येऊ द्या कितीही सोडून जाऊ द्या पण मी दम सोडणार नाही. अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली आहे.
प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकाला साथ दिली ते लोक आज माझ्या पराभवासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. पण ही बाजी आता अमळनेरकर स्वाभिमानी जनतेची आहे. कोणीही कितीही अडथळे आणले तरी अमळनेरकर जनता आम्ही बिकाऊ नाहीत हे दाखवून देणार आहेत.
तालुक्यातून अनेक लोक आज पक्ष सोडून साथ सोडून जात आहेत. जाऊ द्या मतदार हा कुठेही कोणत्याही पक्षात जात नाही. तो सत्याच्या पाठीशी असतो. सत्याला अनेक सत्व मोजावे लागतात.अनेक परीक्षा द्याव्या लागतात. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्यें असलो आणि आघाडी मित्रपक्ष काँग्रेस असून त्यात पक्षाचे अनेक राष्ट्रवादी व काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहेत. त्यांच्या बळावर मी लढाई लढण्यासाठी उतरलो आहे.
जनतेच्या मनातील कौल कुणाच्या मालकीचा नसतो. यासाठी काहीही होवो आपण लढाईत हरणार नाही ही देवासारखे पवित्र असलेले मतदार तालुका मला गावागावात प्रचंड साथ देत आहे. त्यांच्या हवाली मी माझी लढाई आहे. मान कापली गेली तरी चालेल पण आपण पक्ष बदलणार नाही असे लोकही जात आहेत जाऊ द्या त्यामुळे मी आयाराम गयाराम नेत्यांच्या बळावर निवडणूक लढत नाही. ही लढाई आता तालुक्याच्या अस्तित्वाची झाली आहे. अभी नही तो कभी नाही. याची जाणीव स्थानिक नागरिकांना आहे. सध्या मतदार इतका जागरुक आहे की तो कोण कशासाठी जातो आहे. हे जाणून आहे.